S M L

शेतकऱ्यांनो संप मागे घ्या, चर्चेसाठी सरकार तयार - सदाभाऊ खोत

तोडगा निघेपर्यंत शेतकऱ्यांनी हिंसक आंदोलन करू नये आणि कायदा हातात घेऊ नये, असं आवाहनही राज्य सरकारनं शेतकऱ्यांना केलं आहे.

Samruddha Bhambure | Updated On: Jun 1, 2017 04:36 PM IST

शेतकऱ्यांनो संप मागे घ्या, चर्चेसाठी सरकार तयार - सदाभाऊ खोत

01 जून : आज सकाळपासूनच राज्यातील शेतकऱ्यांनी शेतमालाला हमीभाव द्यावं, कर्जमाफी करावी अशा विविध मागण्यांसाठी संपाच एलगार पुकारला आहे. मात्र, आत शेतकरांनी संप मागे घ्यावा, सरकार चर्चसाठी तयार असल्याचं कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितलं आहे.

शेतकऱ्यांच्या संपाला अनेक ठिकाणी हिंसक वळण पाहायला मिळाला. काही ठिकाणी वाहनांची तोडफोड केलेली दिसून आली तर काही ठिकाणी दुध रस्त्यावर ओतून आंदोलन करण्यात आलं. त्यानंतर कृषिमंत्री चंद्रकांत पाटील, पणनमंत्री सदाभाऊ खोत, आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्यात आज दुपारी एक बैठक झाली. या बैठकीत शेतकऱ्यांनी घेतलेल्या संपाच्या भुमिकेविषयी चर्चा झाली.

याबैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सदाभाऊ खोच यांनी ही माहिती दिली.

सरकार शेतकऱ्यांना सोबत घेऊन या प्रश्नावर मार्ग काढेल. हे सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांवर, आणि त्यांच्या प्रश्नांबाबत गंभीर आहे. शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी चर्चेसाठी पुढे याव, असं ते म्हणाले आहेत.

त्याचबरोबर, तोडगा निघेपर्यंत शेतकऱ्यांनी हिंसक आंदोलन करू नये आणि कायदा हातात घेऊ नये, असं आवाहनही राज्य सरकारनं  शेतकऱ्यांना केलं आहे.

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 1, 2017 04:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close