S M L

राहुल गांधींच्या दौऱ्याला राणेंची दांडी?

राहुल उद्या नांदेड आणि परभणीच्या दौऱ्यावर येतायेत, त्याला राणे दांडी मारणार असल्याचं कळतंय. राहुल यांच्या दौऱ्यादरम्यान काँग्रेस नेत्यांची नांदेडमध्ये बैठकही होणार आहे, त्यालाही राणे जाणार नाहीत असं कळतंय.

Sonali Deshpande | Updated On: Sep 7, 2017 10:04 PM IST

राहुल गांधींच्या दौऱ्याला राणेंची दांडी?

प्राजक्ता पोळ, मुंबई, 07 सप्टेंबर : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींच्या उद्याच्या दौऱ्याला नारायण राणे गैरहजर राहण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून आयबीएन लोकमतला ही माहिती मिळाली आहे.

राहुल उद्या नांदेड आणि परभणीच्या दौऱ्यावर येतायेत, त्याला राणे दांडी मारणार असल्याचं कळतंय. राहुल यांच्या दौऱ्यादरम्यान काँग्रेस नेत्यांची नांदेडमध्ये बैठकही होणार आहे, त्यालाही राणे जाणार नाहीत असं कळतंय.

गेले काही दिवस नारायण राणे भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. नांदेड हा अशोक चव्हाणांचा बालेकिल्ला आहे. अशोक चव्हाण आणि राणे यांचं फारसं जमत नाही.

शिवाय उद्या मुंबईत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुंबईत आहेत. अशा परिस्थितीत राणे मुंबईत गडकरींची भेट घेणार का, याकडेही लक्ष लागलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 7, 2017 10:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close