S M L

बीडमध्ये पोलिसांककडूनच रमेश कदमाचा शाही पाहुणचार

आमदार रमेश कदम यांची बीडमध्ये शाही बडदास्त ठेवली जातेय. एवढंच नाहीतर रमेश कदमांचा मुक्काम बीडच्या शासकीय विश्रामगृहात होता.

Sachin Salve | Updated On: Jul 20, 2017 07:09 PM IST

बीडमध्ये पोलिसांककडूनच रमेश कदमाचा शाही पाहुणचार

20 जुलै : आमदार रमेश कदम यांची बीडमध्ये शाही बडदास्त ठेवली जातेय. एवढंच नाहीतर रमेश कदमांचा मुक्काम बीडच्या शासकीय विश्रामगृहात होता.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम हे सध्या अण्णाभाऊ साठे महामंडळातील कोट्यवधी रुपयाच्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरून जेलमध्ये आहेत. परंतु, बीड येथील शिवाजी नगर पोलीस स्थानकात अशाच एका भ्रष्टाचाराच्या आरोपात ते मुख्य आरोपी असून त्यांना बीड येथे तपासाच्या कामासाठी आणले असता त्यांची शाही बडदास्त पोलिसांनी ठेवली.

आरोपी असताना देखील रमेश कदम यास बीडच्या शासकीय विश्रामगृहात ठेवण्यात आलं एवढंच नाही तर पोलीस अधिकारी त्याच बरोबर सीआयडीचे अधिकारी हे त्यांची खातीरदारी करताना दिसत होते.

दरम्यान, या संबंधी बीडचे पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्याशी संपर्क साधून याबाबत विचारणा केली असता सीआयडीच्या अधिकाऱ्यांना विचारा असं त्यांनी सांगून त्यांनी काढता पाय घेतला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 20, 2017 07:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close