S M L

तूर खरेदीत मोठा घोटाळा,राजू शेट्टींचा आरोप

तूर खरेदीसाठी रस्त्यावर उतरू असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिलाय.

Sachin Salve | Updated On: Apr 24, 2017 04:20 PM IST

तूर खरेदीत मोठा घोटाळा,राजू शेट्टींचा आरोप

24 एप्रिल : राज्यात तूर खरेदीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केलाय. तूर खरेदीसाठी रस्त्यावर उतरु असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिलाय.

तूर खरेदी बंद म्हणजे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचा प्रकार आहे.. व्यापारी आणि नाफेडच्या संगनमताने शेतकऱ्याची फसवणूक होत असल्याचंही राजू शेट्टी म्हणालेत.  व्यापारी आणि नाफेड अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी राजू शेट्टी यांनी केल्या.

शेतकऱ्याची तूर सरकारचा खरेदी करावीच लागेल शेतकऱ्यांनी कवडीमोल भावात तूर विकू नये शेतकऱ्यांसाठी कुणी संघर्ष केला तर त्याचं स्वागतचं आहे, असं म्हणत त्यांनी विरोधकांच्या संघर्ष यात्रेचं कौतुक केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 24, 2017 04:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close