S M L

विरोधक असताना घोटाळे बाहेर काढणारे मुख्यमंत्री आता गप्प का ? - राजू शेट्टी

गेल्या काही दिवसांपासून भाजपचे मित्रपक्ष असलेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर नाराज दिसतायेत.

Sonali Deshpande | Updated On: May 7, 2017 07:55 PM IST

विरोधक असताना घोटाळे बाहेर काढणारे मुख्यमंत्री आता गप्प का ? - राजू शेट्टी

07 मे : गेल्या काही दिवसांपासून भाजपचे मित्रपक्ष असलेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर नाराज दिसतायेत. त्यामुळे वेळ मिळेल तिथं सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर राजू शेट्टी टीका करतायेत. यावेळीही राजू शेट्टींनी मुख्यमंत्र्यांना लक्ष केलंय. मुख्यमंत्री नक्की काय करताहेत हेच माहीत नाही असा टोला राजू शेट्टींनी मुख्यमंत्र्यांना लगावलाय.

साखर कारखान्याच्या अनेक फाईल्स पडून आहेत. पण मुख्यमंत्री काहीच करीत नाही असंही शेट्टींनी म्हटलंय. विरोधक असताना घोटाळे बाहेर काढणारे मुख्यमंत्री आता गप्प का,  बैलगाडीभर आणलेले पुरावे गेले कुठे , कोणतीच कारवाई होताना दिसत नाही, असा सवाल राजू शेट्टी यांनी विचारला आहे.

महादेव जानकर हे आमच्यासोबत आहेत.आमचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत.ते आमच्या सोबत येतील, असंही राजू शेट्टी म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 7, 2017 07:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close