S M L

विदर्भात पावसाचं पुनरागमन;मराठवाड्यात मात्र अजूनही प्रतीक्षा

उद्या विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Chittatosh Khandekar | Updated On: Aug 19, 2017 12:47 PM IST

विदर्भात पावसाचं पुनरागमन;मराठवाड्यात मात्र अजूनही प्रतीक्षा

19 ऑगस्ट: विदर्भात काही भागात काल रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली आहे. उद्या विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

नागपूर शहरात शुक्रवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. इथे शुक्रवारी रात्री तीन तासात 141.9 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आजही विदर्भात सर्वत्र मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. भंडाऱ्यातही पावसाने चांगली हजेरी लावली आहे. गेल्या अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर बुलढाणा जिल्ह्यात आज सकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी वर्गात मोठ्या प्रमाणात आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी लोकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. त्यामुळे पावसामुळे सर्वसामान्य नागरिकही सुखावला आहे. अजून काही दिवस असाच पाऊस पडला तर सुकलेल्या पिकांना नवंसंजीवनी मिळू शकते.

तर दुसरीकडे मराठवाड्यात मात्र पावसाने दडी मारली आहे. हवा तेवढा पाऊस मराठवाड्यात झालेला नाही, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. बीड जिल्ह्यात पावसाअभावी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 19, 2017 09:18 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close