S M L

सुभाष देसाईंच्या राजीनाम्याचा फक्त राजकीय ड्रामा -विखे पाटलांची टीका

"सुभाष देसाईंनी मुख्यमंत्री यांच्याकडे राजीनामा देणं आणि मुख्यमंत्री यांनी नाकारणं म्हणजे नाटक आहे"

Sachin Salve | Updated On: Aug 12, 2017 05:29 PM IST

सुभाष देसाईंच्या राजीनाम्याचा फक्त राजकीय ड्रामा -विखे पाटलांची टीका

12 आॅगस्ट : सुभाष देसाईंनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा देणं आणि मुख्यमंत्र्यांनी तो नाकारणं म्हणजे राजकीय नाट्याचा खेळ आहे, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुभाष देसाई प्रकरणावरून सडकून टीका केलीय. सुभाष देसाईंनी सभागृहातच राजीनामा द्यायला हवा होता पण तसं झालं नाही. मुख्यमंत्री यांच्याकडे राजीनामा देणं आणि मुख्यमंत्री यांनी नाकारणं म्हणजे नाटक आहे.  हा राजकीय नाट्यचा फक्त खेळ सुरू आहे अशी टीका पाटील यांनी केली.

तसंच उद्धव ठाकरेंचाही विखेंनी समाचार घेतला. विरोधकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यापेक्षा मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावर बोला, मुंबई महापालिकेत सर्वाधिक भ्रष्टाचार आहे, असा आरोपही त्यांनी केला.

पुरावे देऊन सुद्धा मंत्र्यांनी राजीनामा दिला नाही, आता न्यायालयात दाद मागण्याचा आमचा विचार आहे असा इशाराही विखे पाटलांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 12, 2017 05:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close