S M L

पुणे : देवदर्शनासाठी गेलेल्या महिलेवर शिंदवणे घाटात कारमध्ये गँगरेप

. उरूळी कांचन -जेजुरी मार्गावरच्या शिंदवणे घाटातली ही घटना आहे.

Sachin Salve | Updated On: Jun 17, 2017 03:05 PM IST

पुणे : देवदर्शनासाठी गेलेल्या महिलेवर शिंदवणे घाटात कारमध्ये गँगरेप

17 जून : देवदर्शनासाठी गेलेल्या महिलेवर फॉर्चूनरमध्ये गँगरेप करण्यात आलाय. उरूळी कांचन -जेजुरी मार्गावरच्या शिंदवणे घाटातली ही घटना आहे.

नारायणपूरहून देवदर्शन घेतल्यानंतर ती महिला घरी परतत होती. घरी येण्यासाठी ती पारगाव चौफुला इथं उभी होती. यावेळी ही फॉर्चूनर गाडीतून दोघे आले आणि त्यांनी त्या महिलेचं अपहरण केलं. घाटातून नेऊन तिच्या बलात्कार केला. त्यानंतर त्या महिलेला घाटामध्ये सोडून ते नराधम तिथून पसार झाले.

पीडित महिलेनं एका दुचाकीस्वाराच्या मदतीनं त्या गाडीचा नंबर मिळवलाय. घटनेची लोणी काळभोर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस आरोपीचा शोध घेतायत. मात्र अजूनही त्या नराधमांना पोलिसांनी अटक केलेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 17, 2017 03:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close