S M L

ठाण्यात पेट्रोल पंपावर मापात पाप,ग्राहकांनी दिला पंपचालकाला चोप

त्यामुळे संतापलेल्या ग्राहकांनी पेट्रोल पंप व्यवस्थापकाला मारहाण केली.

Sachin Salve | Updated On: Nov 28, 2017 08:47 AM IST

ठाण्यात पेट्रोल पंपावर मापात पाप,ग्राहकांनी दिला पंपचालकाला चोप

28 नोव्हेंबर : ठाण्यात एका पेट्रोल पंपावर मापात पाप करण्याचा प्रकार समोर आलाय. त्यामुळे संतापलेल्या ग्राहकांनी पेट्रोल पंपचालकाला मारहाण केली.

तीन हात नाका येथील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला गेलेल्या वाहनात पाणी आढळलं. दुचाकी वाहन चालकांनी बाईकमध्ये पेट्रोल भरल्यानंतर त्याच्या गाड्या बंद पडत असल्याचं निदर्शनास आलं.

यावर काहींनी पेट्रोल टाकी उघडून पाहिली असताना त्यामधून रॉकेल, थिनरचा वास येत होता. तर काहींनी बाटलीत पेट्रोल काढून पाहिले तर काहींच्या बाटली पेट्रोलमध्ये भेसळ केल्याचं निदर्शनास आले तर पेट्रोल भरताना लिटर मागे चोरी होत असल्याचे ही मोजमाप केल्यावर आढळून आलं.

त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी पेट्रोल पंप बंद पाडला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 28, 2017 08:47 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close