S M L

आता बोला !, पुणे महावितरण परिमंडळाचीच तब्बल 200 कोटींची थकबाकी

महावितरणच्या पुणे परिमंडळाकडची थकबाकी 200 कोटींच्या घरात गेलीय. आणि ही रक्कम एप्रिलपासूनची. यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही धाबे दणाणलेत.

Sachin Salve | Updated On: Sep 15, 2017 04:26 PM IST

आता बोला !, पुणे महावितरण परिमंडळाचीच तब्बल 200 कोटींची थकबाकी

15 सप्टेंबर : सर्वसामान्यांच्या वीजबिलाचे १०० रुपये थकले तरी विज तोडण्याची कारवाई महावितरण करत असते. पण याच  महावितरण पुणे परिमंडळातील थकबाकी सुमारे २०० कोटींच्या घरात गेल्याचं समोर आलंय.

विजेचं बिल भरायला कधी उशीर झाला असेल तर तुम्हाला अनुभव असेल की लगेच वीज तोडण्याची भीती दाखवली जाते. पण महावितरण हे सोयीनं करते की काय, असा प्रश्न निर्माण झालाय.

याचं कारण असं, की महावितरणच्या पुणे परिमंडळाकडची थकबाकी 200 कोटींच्या घरात गेलीय. आणि ही रक्कम एप्रिलपासूनची. यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही धाबे दणाणलेत. मुख्यालयातून तसा फर्मानच निघालाय. थकबाकी वसुलीला प्राधान्य देण्याचे आदेश ऊर्जा मंत्रालयातून दिले गेलेत. पण ही रक्कम इतकी फुगेपर्यंत महावितरण झोपलं होतं का, असा सवाल नागरिक करतायत.

महावितरणच्या अधिकाऱ्यांशी आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण कॅमेऱ्यासमोर बोलायला कुणीच तयार नाही. वेळेवर बिलं वसूल केली तर दुरुस्ती आणि नव्या सोयींसाठीही जास्त पैसे उरतील, हे साधं गणित महावितरणला कळायला हवं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 15, 2017 04:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close