S M L

रावते-एसटी कर्मचाऱ्यांची चर्चा पुन्हा फिस्कटली

दिवाकर रावते आणि एसटी कर्मचाऱ्यांची चर्चा पुन्हा फिस्कटली असून आता मात्र रावतेंनी मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली आहे.

Chittatosh Khandekar | Updated On: Oct 19, 2017 03:24 PM IST

रावते-एसटी कर्मचाऱ्यांची चर्चा पुन्हा फिस्कटली

19 ऑक्टोबर: गेले तीन दिवस चाललेला एसटी संप आता चिघळण्याची चिन्ह दिसत आहेत. कारण परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि एसटी कर्मचाऱ्यांची चर्चा पुन्हा फिस्कटली असून आता मात्र रावतेंनी मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली आहे.

काल रात्री संपकरी कर्मचारी आणि रावतेंमध्ये चर्चा झाली. पण या चर्चेतून काही निष्पन्न झालं नाही. त्यानंतर आज दोन्ही बाजू एकामेकास भेटण्यास तयार नाही.

सकाळपासून कुठलीही चर्चा झालेली नाही. संपाच्या चर्चेबाबतची माहिती रावतेंनी मुख्यमंत्र्यांना दिली आहे. आता यापुढे हा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री मध्यस्थी करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सध्यातरी या राज्यव्यापी संपामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 19, 2017 03:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close