S M L

एटीएममध्ये खडखडाट, सगळीकडे 'नो कॅश'चा बोर्ड

नागरिकांना एटीएममध्ये वारंवार फेऱ्या मारूनही कॅश मिळत नसल्याचं चित्र दिसून येत आहे.

Sonali Deshpande | Updated On: Apr 6, 2017 11:05 AM IST

एटीएममध्ये खडखडाट, सगळीकडे 'नो कॅश'चा बोर्ड

06 एप्रिल : गेल्या दोन दिवसांपासून मुंबई आणि पुण्यात एटीएममध्ये पुन्हा खडखडाट पहायला मिळतोय. त्याचबरोबर नाशिक आणि नागपूर इथेही हेच चित्र दिसतंय. त्यामुळे सर्वसामान्यांची मोठी अडचण झालीय. चलनतुटवडा निर्माण झाल्याने ही स्थिती निर्माण झालीय. नागरिकांना एटीएममध्ये वारंवार फेऱ्या मारूनही कॅश मिळत नसल्याचं चित्र दिसून येत आहे.

अनेक बँकांच्या एटीएममध्ये खडखडाट पाहायला मिळाला.सर्वच एटीएम बाहेर 'नो कॅश'चा बोर्ड झळकत होता. काही ठिकाणी बँका सुरू होत्या मात्र एटीएममध्ये पैसे नव्हते. बहुतांशी बँकांमध्ये फक्त आपल्याच बँकेचं एटीएम वापरण्याची मनमानी सूरू होती.. दुसऱ्या बँकेच्या एटीटीएमच्या वापरानंतर सिस्टीम डाऊन असल्याचा मेसेज येत होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 6, 2017 11:05 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close