S M L

काँग्रेसची परिस्थिती अशी कशी ?, नितेश राणेंचं वेतन देण्यास नकार

आमदारांचं एक महिन्याचं वेतन पक्षासाठी देण्याला नितेश राणेंनी विरोध दर्शवला आहे.

Sachin Salve | Updated On: Apr 19, 2017 07:18 PM IST

काँग्रेसची परिस्थिती अशी कशी ?, नितेश राणेंचं वेतन देण्यास नकार

19 एप्रिल - निलेश राणे पाठोपाठ आता नितेश राणेंची प्रदेश काँग्रेसवर टीका करून घरचा अहेर दिलाय.  आमदारांचं एक महिन्याचं वेतन पक्षासाठी देण्याला नितेश राणेंनी विरोध दर्शवला आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शेतकऱ्यांना निधी देण्यासाठी आमदारांना 1 महिन्याचा पगार देण्याचा प्रस्ताव मांडलाय. मात्र, काँग्रेसचेच आमदार नितेश राणे यांनी याला विरोध दर्शवलाय. पक्षाकडून शेतकऱ्यांसाठी आमदाराच्या वेतनाची मागणी करण्यात आलीये. पण 60 वर्षं राज्य केलेल्या काँग्रेसची आर्थिक परिस्थिती अशी कशी ? असा थेट सवालच त्यांनी उपस्थितीत केला.

आपल्याला पक्षासाठी योगदान द्यायला जमत नाही म्हणून आमदारांकडे एक महिन्याच वेतन का मागता ? असा थेट सवालही नितेश राणेंचा अशोक चव्हाणांना विचारला.

तसंच आम्ही आमच्या हिंमतीवर निवडणुका लढवतो. त्यामुळे निधी देणारा नसल्याचं नितेश राणेंनी स्पष्ट केलं.  अहमादाबादमध्ये  मुख्यमंत्र्यांच्या गाडीत नारायण राणे यांच्या भेटीबद्दल पत्रकारांनी विचारले असता. या वृत्ताचा व्हिडिओ कधीचा आहे ते तुम्ही तपासा असं सांगत राणेंनी अंग झटकलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 19, 2017 07:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close