S M L

नेवाळी दंगलीप्रकरणी खोणी गावातील १६ जणांची शरणागती

अंबरनाथ तालुक्यातल्या नेवाळी इथं गुरुवारी नौदलाकडून होत असलेल्या जमीन अधिग्रहणाविरोधात उग्र आंदोलन झालं होतं.

Sachin Salve | Updated On: Jun 26, 2017 09:30 PM IST

नेवाळी दंगलीप्रकरणी खोणी गावातील १६ जणांची शरणागती

26 जून : अंबरनाथ तालुक्यातल्या नेवाळी इथं गुरुवारी नौदलाकडून होत असलेल्या जमीन अधिग्रहणाविरोधात उग्र आंदोलन झालं होतं. यानंतर शेकडो आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. यापैकी मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या खोणी गावातील आंदोलकांनी काल शरणागती पत्करली.

नेवाळीत आंदोलनादरम्यान पोलिसांवर हल्ले करत त्यांच्या गाड्याही जाळण्यात आल्या होत्या. मात्र खोणी गावात केवळ रस्त्यावर टायर जाळून कुठलीही हिंसा न करता हे आंदोलन झालं होतं. याप्रकरणी आंदोलकांवर मानपाडा पोलीस ठाण्यात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर अखेर रविवारी खोणी गावातील १६ जणांनी पोलीस ठाण्यात हजर होत शरणागती पत्करली. या सर्वांना आज सुट्टीच्या न्यायालयात हजर केलं असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 26, 2017 09:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close