S M L

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण ढोबळेंनी धरले नितीन गडकरींचे पाय

शरद पवार यांचे एकेकाळचे विश्वासू आणि मातंग समाजाचे नेतृत्व करणाऱ्या लक्ष्मणराव ढोबळे हे गेल्या दोन वर्षापासून भाजपत येण्यासाठी इच्छुक आहेत.

Sachin Salve | Updated On: Feb 13, 2018 07:43 PM IST

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण ढोबळेंनी धरले नितीन गडकरींचे पाय

13 फेब्रुवारी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री असलेले लक्ष्मण ढोबळे यांनी चक्क केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे चरणस्पर्श केल्याने खळबळ माजलीय.

शरद पवार यांचे एकेकाळचे विश्वासू आणि मातंग समाजाचे नेतृत्व करणाऱ्या लक्ष्मणराव ढोबळे हे गेल्या दोन वर्षापासून भाजपत येण्यासाठी इच्छुक आहेत.

मात्र काही तांत्रिक कारणांमुळे त्यांचा भाजप प्रवेश थांबलाय. त्यामुळे भाजपत प्रवेश मिळावा यासाठी ढोबळे यांनी चक्क नितीन गडकरींचे पाय धरले.

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानी नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. त्यावेळी हा प्रकार पाहून राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या.

दरम्यान, ढोबळे यांनी गडकरी यांचे आशीर्वाद घेतल्याने आता पुन्हा एकदा ढोबळे भाजपात जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 13, 2018 07:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close