S M L

नयना पुजारीच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा

ही घटना अत्यंत हीन कृत्य असून दुर्मिळातील दुर्मिळ घटना असल्याचं नमूद करत पुणे सत्र न्यायालयाने आपला निर्णय दिला.

Sachin Salve | Updated On: May 9, 2017 06:03 PM IST

नयना पुजारीच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा

09 मे : नयना पुजारी बलात्कार आणि हत्येप्रकरणी तिन्ही दोषींना पुणे सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलीये. ही घटना अत्यंत हीन कृत्य असून दुर्मिळातील दुर्मिळ घटना असल्याचं नमूद करत पुणे सत्र न्यायालयाने आपला निर्णय दिला.

संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या नयना पुजारी बलात्कार आणि हत्याप्रकरणी तिन्ही दोषींना अखेर  शिक्षा सुनावण्यात आली. आरोपी योगेश राऊत, महेश ठाकूर आणि विश्वास कदम या तिघांवर बलात्कार, हत्या, अपहरण आणि चोरीचा आरोप सिद्ध झाले. तर माफीचा साक्षीदार राजेश चौधरीला दोषमुक्त करण्यात आलं आहे.

आज सकाळी शिवाजीनगरच्या सत्र न्यायालयात 11 वाजता निकालाचं वाचन सुरू झालं. विशेष म्हणजे फास्ट ट्रॅक कोर्टात केस येऊनही तब्बल सात वर्षांनंतर या खटल्याचा आज निकाल लागला.

काय आहे प्रकरण ?

सिनिक्रॉन या कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून कार्यरत असलेल्या नयना पुजारीचं लिफ्ट देण्याच्या बहाण्याने 7 ऑक्टोबर 2009 रोजी अपहरण करण्यात आलं होतं. त्यानंतर नयनावर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली होती.

कोर्टात काय घडलं?

मुख्य आरोपी योगेश राऊतला बोलायला सांगितलं. माझा गुन्ह्याशी संबंध नाही माझी गाडी राजेश चौधरी याने नेली होती त्यानेच गुन्ह्यात वापरली. माफीचा साक्षीदार झालेला ही तितकाच दोषी त्याला ही शिक्षा द्या माझ्या घरी बायको मुलगी आहे त्यांना सांभाळायला कुणी नाही. माझ्या कुटुंबाचा विचार व्हावा मुख्य आरोपी योगेश राऊतची कोर्टाकडे याचना

- महेश ठाकूर आरोपी क्रमांक २ माझा काही संबंध नाही

- विश्वास कदम आरोपी ३ काही बोलायचं नाही

- सरकारी वकिलांनी केली फाशीची मागणी

- गुन्हा अत्यंत गंभीर - सरकारी वकील

- गुन्हेगारांना फाशीची शिक्षाच योग्य - सरकारी वकील

- आजही आरोपींना कृत्याबद्द्ल पश्चाताप नाही.

- दुर्मिळातील दुर्मिळ घटना कोर्टाकडून नोंद

- तिन्ही दोषींना फाशीची शिक्षा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 9, 2017 05:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close