S M L

आवडत्या महाविद्यालयात प्रवेश न मिळाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

नांदेडच्या यशवंत महाविद्यालयातून 12 मध्ये पास झाली होती. यशवंत महाविद्यालयामध्येच कॉमर्स शाखेच्या प्रथम वर्षात तीला प्रवेश हवा होता

Sachin Salve | Updated On: Jun 28, 2017 08:38 PM IST

आवडत्या महाविद्यालयात प्रवेश न मिळाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

28 जून : केवळ आवडत्या महाविद्यालयात प्रवेश न मिळाल्याने विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नांदेडमध्ये घडलीये. 19 वर्षीय वर्षा नादरे असं विद्यार्थिनीचं नाव आहे.

मुळची हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील गिरगांवची राहणारी वर्षा नांदेडमध्ये शिक्षणासाठी राहत होती. नांदेडच्या यशवंत महाविद्यालयातून 12 मध्ये पास झाली होती. यशवंत महाविद्यालयामध्येच कॉमर्स शाखेच्या प्रथम वर्षात तीला प्रवेश हवा होता. तीची लहान बहीण आणि मावस बहिणीला यशवंत महाविद्यालयात प्रवेश मिलाला मात्र वर्षाला यशवंत महाविद्यालयात प्रवेश मिळू शकला नाही. त्यामुळे वर्षा चिंतग्रस्त झाली होती.

दुसऱ्या महाविद्यालयात तीला प्रवेश मिळाला होता. पण यशवंत महाविद्यालयात प्रवेश न मिळाल्याने वर्षाने नांदेडच्या गोवर्धन घाट पुलावारुन नदीपात्रात उडी घेऊन आपले जीवन संपवले. या प्रकरणी वजिराबद पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 28, 2017 08:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close