S M L

गेम खेळताना मोबाईल बॅटरीचा स्फोट,विद्यार्थी जखमी

मुदस्सीर मोबाईलवर गेम खेळत असताना हा स्फोट झाला

Sachin Salve | Updated On: Apr 1, 2017 05:02 PM IST

गेम खेळताना मोबाईल बॅटरीचा स्फोट,विद्यार्थी जखमी

01 एप्रिल : औरंगाबादेत मोबाईल बॅटरीचा स्फोट होवून एक विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना शहरानजिक असलेल्या मिटमिटा परिसरातील एका मदरश्यामध्ये घडली.

या घटनेत बारा वर्षांचा मुदस्सीर मुक्तार शेख नावाचा विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. मुदस्सीर मोबाईलवर गेम खेळत असताना हा स्फोट झाल्याची मदरसा संचालकाने माहिती दिली.

गंभीर जखमी मुदस्सीरवर घाटी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि एटीएसनं घटनास्थाळाची पाहणी केली. छावणी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद कऱण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 1, 2017 05:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close