S M L

कोरेगाव भीमा प्रकरणातले किरकोळ गुन्हे रद्द करणार-मुख्यमंत्री

भीमा कोरेगाव झालेल्या हिंसाचारावरुन एकूण १५८ गुन्हे दाखल झाले आहेत. यापैकी २२ जण अजूनही अटकेत आहेत. तर ३०० ते ३५० जणांवर गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत

Chittatosh Khandekar | Updated On: Mar 13, 2018 07:53 PM IST

कोरेगाव भीमा प्रकरणातले किरकोळ गुन्हे रद्द करणार-मुख्यमंत्री

13 मार्च:  1 जानेवारी  भीमा कोरेगावात झालेला  हिंसाचार  आणि त्याच्या दोन दिवसांनंतर झालेल्या बंदामधील गुन्हे रद्द करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.  गंभीर गुन्ह्यांवर मात्र खटले सुरूच राहणार  आहे.  ही माहिती  त्यांनी विधानपरिषदेत दिली .

गंभीर गुन्ह्यासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या अहवालानंतर निर्णय घेण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान वढू -तुळापुरातली छत्रपती संभाजी महाराजांची समाधी सरकार ताब्यात घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी आज विधीमंडळात दिली आहे.  याशिवाय मिलिंद एकबोटेंच्या कस्टोडीअल चौकशीची मागणी सरकारकडून करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

कोरेगाव-भीमावर आज मुख्यमंत्र्यांनी निवेदन दिलं आहे.  याप्रकरणात सरकार 9 कोटी 45 लाख रुपयांची नुकसान भरपाई देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

भीमा कोरेगाव झालेल्या हिंसाचारावरुन एकूण १५८ गुन्हे दाखल झाले आहेत. यापैकी २२ जण अजूनही अटकेत आहेत. तर ३०० ते ३५० जणांवर गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. याशिवाय राज्यात अॅट्रॉसिटीचे १७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.  मिलिंद एकबोटेंना अटक करण्यासाठी तात्काळ गुन्हा दाखल केला. ते फरार झाल्यानंतर कोंबिग ऑपरेशन केलं. सर्च ऑपरेशन केलं. पण त्यांना सुप्रिम कोर्टानं जामीन दिला, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 13, 2018 07:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close