S M L

मेधा खोले यांनी तक्रार घेतली मागे

मेधा खोले आज संध्याकाळी सिंहगड रोड पोलीस स्टेशनात गेल्या होत्या.

Chittatosh Khandekar | Updated On: Sep 9, 2017 06:33 PM IST

मेधा खोले यांनी तक्रार घेतली मागे

पुणे,09 सप्टेंबर: जात लपवल्यामुळे स्वयंपाकिणी विरूद्ध तक्रार करणाऱ्या मेधा खोले आता तिच तक्रार मागे घेतली आहे.   मेधा खोले आज संध्याकाळी सिंहगड रोड पोलीस स्टेशनात गेल्या होत्या.

हवामान खात्याच्या माजी संचालक डॉ. मेधा खोले यांनी स्वयंपाकिणीने  जात लपवल्या प्रकरणी पोलिसात तक्रार नोंदवली होती. या तक्रारीमुळे  त्यांच्यावर प्रचंड टीका झाली होती. खोले यांच्या घरी स्वयंपाक करणाऱ्या बाईंनी खोटी जात सांगितली आणि मारहाण केली अशी तक्रार खोले यांनी पोलिसात केली होती.

सोवळ्या ओवळ्याला महत्त्व न देता खोले यांनी समजुतीनं पोलिसातली तक्रार मागे घ्यावी असं आवाहन अखिल भारतीय ब्राम्हण महासंघानं केलं होतं. तसंच  राष्ट्रवादीनेही खोले यांच्या विरूद्ध निदर्शनं केली होती. या  पार्श्वभूमीवर हे प्रकरण मिटल्याचं दिसत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 9, 2017 06:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close