S M L

मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराला 24 वर्ष पूर्ण, दिवसभर कार्यक्रमाची रेलचेल

आज डॅा.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 24वा नामविस्तार दिन. आज सकाळपासूनच दलित बांधव मोठ्या प्रमाणात विद्यापीठ गेटाला अभिवादन करण्यासाठी येत आहेत.

Sonali Deshpande | Updated On: Jan 14, 2018 11:47 AM IST

मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराला 24 वर्ष पूर्ण, दिवसभर कार्यक्रमाची रेलचेल

औरंगाबाद, 14 जानेवारी : आज डॅा.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 24वा नामविस्तार दिन. आज सकाळपासूनच दलित बांधव मोठ्या प्रमाणात विद्यापीठ गेटाला अभिवादन करण्यासाठी येत आहेत. अनेक कार्यक्रमांचं आयोजन गेट परिसरात आयोजित करण्यात आले आहेत. काही भाविक विद्यापीठ गेटची भक्तिभावानं पूजाही करतात.

अनेक नेत्यांच्या सभांचं आयोजन आज संध्याकाळी करण्यात आलं आहे. 14 जानेवारी 1994 साली मराठवाडा विद्यापीठाचा डॅा.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार करण्यात आला होता. आज या घटनेला 24 वर्षे झाली. नामविस्तारासाठी राज्यात मोठा सामाजिक संघर्ष झाला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 14, 2018 11:47 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close