S M L

मी धनगर आरक्षणामुळे मंत्री झालो नाही -महादेव जानकर

मी फक्त धनगर आरक्षणामुळे मंत्री झालेलो नाही तर धनगर आरक्षणासाठी मी कटिबद्ध आहे, असं वक्तव्य दुग्धविकास मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी केलंय.

Sachin Salve | Updated On: May 6, 2017 03:46 PM IST

मी धनगर आरक्षणामुळे मंत्री झालो नाही -महादेव जानकर

06 मे : मी फक्त धनगर आरक्षणामुळे मंत्री झालेलो नाही तर धनगर आरक्षणासाठी मी कटिबद्ध आहे, असं वक्तव्य दुग्धविकास मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी केलंय. ते पंढरपूरमध्ये बोलत होते.

धनगर समाजाला आरक्षणप्रश्नी मंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर महादेव जानकर यांची आरक्षणाबाबत भूमिका मवाळ झालीये. पंढरपुरात एका कार्यक्रमात जानकरांनी धनगर आरक्षणामुळे मी राज्यात मंत्री झालो नाही.  धनगरांनी मला मतं दिली असती तर मी केंद्रात मंत्री झालो असतो. पण धनगरांची मतदार संख्या जास्त असलेल्या गावात मला कमी मतं मिळाली आहेत आणि ब्राम्हण मराठा समाज बहुसंख्येने असलेल्या गावात मला जास्त मतं मिळाली आहेत असा दावा केलाय.

स्वाभिमानी संघटनेत राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्या वादावर ही महादेव जानकर यांनी भाष्य केलं. दोघांच्या वादात आपण मध्यस्थी करण्यास तयार असल्याचं सांगत बैलगाडी जेव्हा चालते तेव्हा त्या खालच्या कुत्र्याला वाटते की मी गाडी ओढतो, असा टोलाही त्यांनी लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 6, 2017 03:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close