S M L

कोपर्डी प्रकरणातील आरोपींवर चाकूने हल्ल्याचा प्रयत्न

आरोपींवर न्यायालयाच्या परिसरात चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणी चार जणांना अटक

Sachin Salve | Updated On: Apr 1, 2017 06:34 PM IST

कोपर्डी प्रकरणातील आरोपींवर चाकूने हल्ल्याचा प्रयत्न

01 एप्रिल : अहमदनगर कोपर्डी प्रकरणातील आरोपींवर न्यायालयाच्या परिसरात चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणी चार जणांना पोलिसांनी अटक केलीये.

कोपर्डी खटल्याची जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आज (शनिवारी)सुनावणीसाठी या खटल्यातील आरोपी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे यांना पोलीस जिल्हा न्यायालयात आणले असता.  दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास जिल्हा न्यायालय आवारात कोपर्डीच्या खटल्यातील आरोपींवर चौघांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय.

मात्र पोलिसांनी सतर्कता दाखवल्याने आरोपी बचावाले या प्रकरणी पोलिसांनी  चौघांना ताब्यात घेतलंय. त्यांच्याकडून हत्यारेही जप्त करण्यात आलंय.

यावेळी काहीकाळ न्यायालय आवारात गोंधळ उडाला होता. हल्ला करणारे शिवबा संघटनेचे  असल्याचे समोर आलंय. आरोपींमध्ये राजेंद्र जर्‍हाड, बाबूराव वाळेकर, अमोल खुने, गणेश खुने यांना अटक करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 1, 2017 06:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close