S M L

कोल्हापुरातही पेट्रोल पंपावर मापात पाप

कोल्हापुरातही मापात पाप करणाऱ्या उचगाव मुडशिंगी रोड वरच्या इसार कंपनीच्या पेट्रोल पंपाचा प्रकार ठाणे क्राईम ब्राँचने उघड केला.

Sachin Salve | Updated On: Jul 8, 2017 12:06 AM IST

कोल्हापुरातही पेट्रोल पंपावर मापात पाप

संदीप राजगोळकर, कोल्हापूर

07 जुलै : ठाणे क्राईम ब्राँचने राज्यात सुरू केलेल्या धडक कारवाईत अनेक पेट्रोल पंपावर चालणारी अफरातफर उघड होत आहे. कोल्हापुरातही मापात पाप करणाऱ्या उचगाव मुडशिंगी रोड वरच्या इसार कंपनीच्या पेट्रोल पंपाचा प्रकार ठाणे क्राईम ब्राँचने उघड केला.

या पेट्रोल पंपावर इलेक्ट्राॅनिक चिपच्या माध्यमातून अफरातफर होत असल्याचं निष्पन्न झाल्याने या पंपावर कारवाई करण्यात येत आहे. 5 लिटर पेट्रोल खरेदी केल्यास त्यामध्ये 140 एमएल तूट असल्याचं या पथकाने केलेल्या तपासणीत आढळून आले आहे.

पेट्रोल पंपावर चीपच्या माध्यमातून अफरातफर करणारी टोळी ठाणे क्राईम ब्राँचच्या हाती लागली आहे या टोळीने दिलेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती क्राईम ब्राँचच्या वतीने देण्यात आलीये. हा पेट्रोल पंप एका राजकीय वरदहस्त असलेल्या नगरसेवकाचा असल्याची चर्चा सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 8, 2017 12:06 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close