S M L

कोल्हापूर जिल्हा स्वच्छ भारत मिशनमध्ये देशात अव्वल

या निमित्त 2 ऑक्टोबरला राष्ट्रीय स्तरावरच्या कार्यक्रमात स्वच्छता दर्पण पुरस्काराने कोल्हापूर जिल्ह्याचा गौरव केला जाणार आहे

Chittatosh Khandekar | Updated On: Sep 27, 2017 10:49 AM IST

कोल्हापूर जिल्हा स्वच्छ भारत मिशनमध्ये देशात अव्वल

कोल्हापूर,27 सप्टेंबर: स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्याने उल्लेखनीय काम झालं आहे. स्वच्छतेवर आधारित देण्यात आलेल्या गुणांकनानुसार कोल्हापूर जिल्हा देशात प्रथम स्थानावर आला आहे.

या निमित्त 2 ऑक्टोबरला राष्ट्रीय स्तरावरच्या कार्यक्रमात स्वच्छता दर्पण पुरस्काराने कोल्हापूर जिल्ह्याचा गौरव केला जाणार आहे. महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त केंद्र सरकारच्या पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयामार्फत स्वच्छता दर्पण पुरस्काराचं आयोजन करण्यात आलं होतं. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत होणाऱ्या कामांवर आधारित याचं गुणांकन होतं. या गुणांकनानुसार जिल्ह्याला 90 टक्के गुण मिळाले आहेत. स्वच्छता दर्पण पुरस्कारासाठी पुणे विभागातील कोल्हापूरसह सांगली व सातारा हे तिन्ही जिल्हेही प्रथम क्रमांकावर आहेत.

या उत्कृष्ट काम केलेल्या जिल्ह्यांचा 2 ऑक्टोबर रोजी गौरव केला जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 27, 2017 10:47 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close