S M L

न्यूज 18 लोकमत इम्पॅक्ट: तूर घोटाळ्या प्रकरणी जगदीश राठींना अटक

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील नाफेड केंद्रावर मोठ्या प्रमाणात तूर घोटाळा झाला असल्याचं आता सिद्ध झालं आहे. शेगाव येथील बाजार समितीमधील व्यापारी जगदीश राठी यांच्याकडे शेती नसताना सुद्धा त्यांनी 275 क्विंटल तूर नाफेड केंद्रावर विकून शासनाची फसवणूक केली असल्याचं झालेल्या चौकशीत सिद्ध झालं आहे.

Chittatosh Khandekar | Updated On: Dec 7, 2017 10:26 AM IST

न्यूज 18 लोकमत इम्पॅक्ट: तूर घोटाळ्या प्रकरणी जगदीश राठींना अटक

बुलढाणा,07 डिसेंबर:  शेगाव तूर घोटाळ्यात व्यापारी जगदीश राठीवर आरोप सिद्ध झाले असून  2 दिवसाची पोलीस कोठडी झाली आहे. तूर घोटाळ्याची बातमी न्यूज 18 लोकमतने लावून धरली होती.

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील नाफेड केंद्रावर मोठ्या प्रमाणात तूर घोटाळा झाला असल्याचं आता सिद्ध झालं आहे. शेगाव येथील बाजार समितीमधील व्यापारी जगदीश राठी यांच्याकडे शेती नसताना सुद्धा त्यांनी 275 क्विंटल तूर नाफेड केंद्रावर विकून शासनाची फसवणूक केली असल्याचं झालेल्या चौकशीत सिद्ध झालं आहे. न्यूज 18 लोकमतच्या बातमीचाच हा मोठा इम्पॅक्ट म्हणावा लागेल कारण न्यूज18 लोकमतनेच हा संपूर्ण घोटाळा उघडकीस आणला होता. त्यांनंतर या घोटाळ्याची चौकशी लागली होती.  या चौकशीमध्ये अजूनही मोठे मासे गळ्याला लागणार असून सध्या व्यापारी असलेले जगदीश राठी यांनी 275 क्विंटल तूर खोट्या हमीपत्रावर विकून शासनाची फसवणूक करून मोठा आर्थिक फायदा करून घेतला होता.

या प्रकरणात व्यापारी जगदीश राठी यांच्यावर विविध कलामान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आता यापुढे त्यांना काय शिक्षा होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 7, 2017 10:23 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close