S M L

जीएसटी विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर

देशभरात 1 जुलैपासून होणार लागू

Samruddha Bhambure | Updated On: May 22, 2017 12:52 PM IST

जीएसटी विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर

22 मे : वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी विधेयक आज (सोमवारी) विधानसभेत एकमताने मंजुर करण्यात आले. जीएसटीसंदर्भातील तीन विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात जीएसटी विधेयकावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

एक जुलैपासून लागू होणाऱ्या जीएसटी संदर्भातील विधेयकावर चर्चा करण्यासाठी तीन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं होत. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी या विधेयकाला एकमताने मंजुरी देण्यात आली.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधेयकाला मंजूरी मिळाल्यानंतर सभागृहाचे अभार मानले आहेत. आता हे विधेयक विधानपरिषदेत जाणार आहे.

दरम्यान, या विधायकातून शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राला करकक्षेतून वगळण्यात आले  आहे. तर दूरसंचार, विमा, हॉटेल आणि रेस्टॉरंट्स या सेवा क्षेत्रांसाठी नवे कर दर निश्चित करण्यात आलेत.

इकॉनॉमी श्रेणीतील हवाई प्रवासासह वाहतूक सेवेवर पाच टक्के जीएसटी आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दूरसंचार, विमा, हॉटेल आणि रेस्टॉरंट्स या सेवा क्षेत्रांसाठी अनुक्रमे 5, 12, 18 आणि 28 टक्के करदर लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 22, 2017 12:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close