S M L

ग्रामपंचायत निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान 14 ऐवजी 16 ऑक्टोबरला होणार

राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आता 14 ऐवजी 16 ऑक्टोबर होणार आहे. 14 तारखेला धम्मचक्र परिवर्तन दिन असल्याने मतदानाच्या तारखेत बदलण्याची मागणी विविध राजकीय पक्षांनी केली होती.

Chandrakant Funde | Updated On: Sep 12, 2017 08:13 PM IST

ग्रामपंचायत निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान 14 ऐवजी 16 ऑक्टोबरला होणार

मुंबई : राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आता 14 ऐवजी 16 ऑक्टोबर होणार आहे. 14 तारखेला धम्मचक्र परिवर्तन दिन असल्याने मतदानाच्या तारखेत बदलण्याची मागणी विविध राजकीय पक्षांनी केली होती. त्यानुसार मतदानाची तारीख 2 दिवसांनी पुढे ढकलण्यात आलीय. त्यामुळे आता दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची मतमोजणीची 17 ऑक्टोबर 2017 रोजी होणार आहे. राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी ही माहिती दिली.

राज्य निवडणूक आयोगाने नोव्हेंबर आणि डिसेंबर 2017 मध्ये मुदत संपणाऱ्या 7 हजार 576 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा दोन टप्प्यांतील कार्यक्रम 1 सप्टेंबर 2017 जाहीर केला होता. त्यानुसार 7 आणि 14 ऑक्टोबर 2017 रोजी मतदान होणार होतं, मात्र 14 ऑक्टोबर 2014 रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिन असल्यामुळे मतदानाच्या तारखेत बदल करण्यात यावा, अशी विनंती विविध घटकांकडून करण्यात आली होती.

गोंदियाच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या विनंतीनुसार या जिल्ह्यातील देवरी, सालेकसा, सडक-अर्जुनी व अर्जुनी-मोर या चार नक्षलग्रस्त तालुक्यांतील मतदानाची वेळ सायंकाळी 5.30 ऐवजी दुपारी केवळ 3 वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे. या ठिकाणीदेखील दुसऱ्या टप्प्यात 16 ऑक्टोबर 2017 रोजी मतदान होणार आहे.

ग्रामपंचायत निवडणूक दुसरा टप्पा

मतदान- 16 ऑक्टोबर 2017

मतमोजणी- 17 ऑक्टोबर 2017

दुसऱ्या टप्यातील ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या :

ठाणे- 41, पालघर- 56, रायगड- 242, रत्नागिरी- 222, सिंधुदुर्ग- 325, पुणे- 221, सोलापूर- 192, सातारा- 319,

सांगली- 453, कोल्हापूर- 478, नागपूर- 238, वर्धा- 112, चंद्रपूर- 52, भंडारा- 362, गोंदिया- 353 आणि गडचिरोली- 26.

एकूण- 3,692

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 12, 2017 08:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close