S M L

कर्जमाफीसाठी पैसा कसा उभारणार? शासनापुढचा नवा पेच

केंद्र सरकारने कर्जमाफीसाठी राज्यसरकारला मदत करण्यास स्पष्ट नकार देत याआधीच हात वर केलेत. म्हणूनच कर्जमाफीसाठी आता राज्य सरकारलाच पैसा उभा करावा लागणार आहे.

Sonali Deshpande | Updated On: Jun 28, 2017 02:27 PM IST

कर्जमाफीसाठी पैसा कसा उभारणार? शासनापुढचा नवा पेच

28 जून : राज्यशासनाने शेतकऱ्यांसाठी 34 हजार कोटींची कर्जमाफी जाहीर केलीय खरी पण यासाठी लागणारा पैसा नेमका कुठून आणि कसा उभा करायचा हा प्रश्न सध्या शासनासमोर आ वासून उभा आहे. कारण केंद्र सरकारने कर्जमाफीसाठी राज्यसरकारला मदत करण्यास स्पष्ट नकार देत याआधीच हात वर केलेत. म्हणूनच कर्जमाफीसाठी आता राज्य सरकारलाच पैसा उभा करावा लागणार आहे. यासाठीच राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची आता धावाधाव सुरू आहे.

कर्जमाफीसाठी पैसा कसा उभारणार ?

शासनासमोरचे काही पर्याय

1. शासनाचे मोक्याचे भूखंड विकून पैसे उभे करणे

2. कर्जमाफीबाबत बॉण्ड अर्थात कर्जरोखे शासन काढू शकते पण त्याचा परतावा कसा किती द्यावा याबाबत निर्णय नाही

3. नाबार्डकडून कमी व्याजदारांने कर्ज घेणे

4. अर्थसंकल्पात 30 टक्के कपात करणे पण कपात केल्यास विकासासाठी पैसा शिल्लक राहणार नाही, शासनाचा फक्त पगारांवरचा वार्षिक खर्च हा 9 हजार कोटी आहे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 28, 2017 12:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close