S M L

रयत क्रांती संघटनेचा आज पहिला महिला मेळावा

रयत क्रांती संघटनेला मोठं बळ मिळावं हे या मेळाव्याचं उद्दिष्ट आहे. तसंच महिलांचा सन्मान व्हावा याही उद्देशाने या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे.

Chittatosh Khandekar | Updated On: Sep 27, 2017 09:28 AM IST

रयत क्रांती संघटनेचा आज पहिला महिला मेळावा

इस्लामपूर,27सप्टेंबर: स्वाभिमानी शेतकरी संघटनेपासून दूर झाल्यानंतर सदाभाऊ खोत यांनी रयत क्रांती संघटना स्थापन केली, याच संघटनेचा आज पहिला महिला मेळावा इस्लामपूरमध्ये होणार आहे.

आज इस्लामपूरमध्ये संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी नवरात्रीनिमित्त आदिशक्ती महालक्ष्मीची शकतीज्योत प्रदान सोहळा आयोजीत केला आहे. रयत क्रांती संघटनेला मोठं बळ मिळावं हे या मेळाव्याचं उद्दिष्ट आहे. तसंच महिलांचा सन्मान व्हावा याही उद्देशाने या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. आज दुपारी इस्लामपूर शहरातील गांधी चौक या ठिकाणी तीन वाजता हा मेळावा होणार आहे. दरम्यान राजकीय परिस्थिती पाहता इस्लामपूर शहरात आज रयत क्रांती संघटना शक्तीप्रदर्शन करणार असल्याचीही चर्चा कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात आहे.

काही दिवसांपूर्वी सदाभाऊ खोत स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाहेर पडले होते. त्यानंतर त्यांनी नवीन पक्ष स्थापन करणार असल्याची घोषणा केली होती. घटस्थापनेच्या दिवशी त्यांन या पक्षाचं नाव रयत क्रांती संघटना जाहीर केलं होतं. आता पक्षबांधणी करता वेगवेगळे उपक्रम सध्या ते हाती घेत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 27, 2017 09:28 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close