S M L

दोन वेगवेगळ्या घटनामध्ये 100 क्विंटल कांदा जळून खाक

येवला तालुक्यातील नायगव्हान इथं पुंजाबा ढोणे या शेतकऱ्याच्या कांदा चाळीला आग लागली

Sachin Salve | Updated On: Apr 11, 2017 06:27 PM IST

दोन वेगवेगळ्या घटनामध्ये 100 क्विंटल कांदा जळून खाक

11 एप्रिल : आगीच्या दोन वेगवेगळ्या घटनामध्ये 100 क्विंटल कांद्यासह बारदान आणि कांदा चाळ आणि शेड जळून खाक झालंय.

येवला तालुक्यातील नायगव्हान इथं पुंजाबा ढोणे या शेतकऱ्याच्या कांदा चाळीला आग लागली आणि चाळीत तसंच चाळीबाहेर ठेवलेला कांदा जळाला या घटनेमुळे ढोणे या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.

दुसरी घटना मनमाडपासून जवळ निमोण रोडवर कैलाश बेदमुथा या कांदा व्यापाऱ्यांचा खळा असून त्यात अचानक आग लागून कांद्याचे शेड आणि त्यातील बार्दन जळाले दोन्ही ठिकाणी शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा अंदाज आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 11, 2017 06:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close