S M L

मुख्यमंत्री हेलिकॉप्टर अपघाताची डीजीसीएकडून होणार चौकशी

या अपघाताच्या करण्याची चौकशी करण्यासाठी पायलट आणि इंजिनिअर्सना डिजीसीए म्हणजेच डायरेक्टर ऑफ सिव्हिल अव्हिएशन यांनी चौकशीला हजर होण्याचे आदेश दिले आहेत.

Sachin Salve | Updated On: May 26, 2017 12:54 PM IST

मुख्यमंत्री हेलिकॉप्टर अपघाताची डीजीसीएकडून होणार चौकशी

26 मे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघाताची आता चौकशी होणार आहे. या अपघाताच्या करण्याची चौकशी करण्यासाठी पायलट आणि इंजिनिअर्सना डिजीसीए म्हणजेच डायरेक्टर ऑफ सिव्हिल अव्हिएशन यांनी चौकशीला हजर होण्याचे आदेश दिले आहेत.

डिजीसीएच्या कार्यालयात ही चौकशी केली जाईल. हेलिकॉप्टर लँडिंगसाठीची जागा योग्य होती का? वैमानिकांनी हेलिपॅड ची पाहणी केली होती का? त्याचा रिपोर्ट आणि वस्तुस्थितीचा आढावा काय होता, डिजीसीएच्या हेलिपॅड बाबतचे नियम पाळले गेले का? हेलिकाप्टर उड्डाण करताना हवामानाचा रिपोर्ट घेतला होता का? हेलिकॉटर ची टेक्निकल चाचणी घेतली होती का? याबाबतच्या प्रश्नांची उत्तर त्यांना द्यावी लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 26, 2017 12:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close