S M L

खडसेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशासाठी महादेवाला साकडं

यावेळी सत्ताधाऱ्यांसोबत विरोधी पक्षातील राष्ट्रवादीचे आमदार सतीश पाटील यांनी देखील खडसे यांचे मंत्री मंडळात पुनरागमन व्हावे यासाठी महादेवाला साकडे घातलं आहे.

Chittatosh Khandekar | Updated On: Nov 6, 2017 01:08 PM IST

खडसेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशासाठी महादेवाला साकडं

जळगाव, 06 नोव्हेंबर: राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते आज जळगाव जिल्ह्यातील गुढे गावच्या महादेव मंदिरात रुद्राभिषेक करण्यात आला आहे. यावेळी सत्ताधाऱ्यांसोबत विरोधी पक्षातील राष्ट्रवादीचे आमदार सतीश पाटील यांनी देखील खडसे यांचे मंत्रिमंडळात पुनरागमन व्हावे यासाठी महादेवाला साकडे घातलं आहे.

यावेळी केलेल्या भाषणात खडसे यांनी आपण ४० वर्षाच्या राजकारणात अनेक चढ उतार पहिले आहे. आपल्यावर अनेक आरोप झाले , चौकशा झाल्या , त्यातून निष्पन्न काही झालं नाही,  मात्र अशा प्रकारामुळे आपण खचून जाणारा नेता नाही , तर समाजाच्या हितासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार असल्याचं खडसे म्हणाले. जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील गुढे गावच्या गोपेश्वर महादेव मंदिरात तेथील रहिवासी आणि खडसे समर्थक उत्तमराव महाजन यांनी खडसे यांच्या हस्ते महादेवाला रुद्राभिषेक आयोजित केला होता.

मंदिराचा जीर्णोद्धार आणि खडसे यांचे मंत्रिमंडळात पुनरागमन व्हावं यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याचं आयोजक उत्तमराव महाजन यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 6, 2017 01:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close