S M L

'दंगल'ची चीनमध्ये 1870 कोटींची 'धाकड' कमाई

गलने रविवारपर्यंत 1870 कोटीची बक्कळ कमाई केली. एवढंच नाहीतर फक्त रविवारी 22 कोटींहून अधिक कमाई केलीये.

Sachin Salve | Updated On: Jun 5, 2017 09:44 PM IST

'दंगल'ची चीनमध्ये 1870 कोटींची 'धाकड' कमाई

05 जून : आमिर खानच्या दंगलने चिनी बॉक्स आॅफिसवर आपला दबदबा अजुनही कायम ठेवलाय. दंगलने रविवारपर्यंत 1870 कोटीची बक्कळ कमाई केली. एवढंच नाहीतर फक्त रविवारी 22 कोटींहून अधिक कमाई केलीये.

विशेष म्हणजे  250 कोटीत बनलेला बाहुबली-2 बॉक्स आॅफिसवर आता कमाईत पिछाडीवर गेलाय. पण तरीही चीनमध्ये दंगलची लोकप्रियता मात्र महिनाभरात तीळभर ही कमी झालेली नाही.

चीनमध्ये नुकताच प्रदर्शित झालेला पायरेट्स आॅफ कॅरेबियनसारखा जग-प्रसिद्ध सिनेमा ही 'दंगल'ची घोडदौड रोखू शकला नाही. 'दंगल'ने 'कोंग:स्कल आॅफ आयलँड'ला या हॉलिवूड सिनेमाला ही मागे टाकलंय.

येते काही दिवस ही 'दंगल' चा ग्राफ असाच चढता राहील अशी अपेक्षा आहे. दंगलच्या यशामुळे आमिर खानने लोकप्रियतेत चीनमध्ये पंतप्रधान मोदींना ही मागे टाकले आहे.

चीनमध्ये धुमाकूळ घालणारा दंगल हा सिनेमा हरियाणाचे पैलवान महावीर फोगाट यांच्या आयुष्यावर बेतलेला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 5, 2017 09:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close