S M L

हल्लाबोल करून दाखवाच,तुमचाही मालमसाला उघड करू, मुख्यमंत्र्यांचा इशारा

"जर हल्लाबोल केला तर यांचा इतका माल मसाला आमच्याकडे आहे तो आम्ही उघडा करू"

Sachin Salve | Updated On: Dec 1, 2017 11:08 PM IST

हल्लाबोल करून दाखवाच,तुमचाही मालमसाला उघड करू, मुख्यमंत्र्यांचा इशारा

01 डिसेंबर : जर 15 वर्षं डल्ला मारला नसता तर आज हल्लाबोल यात्रा करण्याची गरज नसती असं सणसणीत टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. तसंच हल्लाबोल करून दाखवाच तुमचा मालमसाला उघड करू अशा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.

हिवाळी अधिवेशनच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने आज वर्ध्यापासून हल्लाबोल यात्रा सुरू केलीये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडच्या सभेत राष्ट्रवादी हल्लाबोल यात्रेचा खरपूस समाचार घेत चांगलाच इशारा दिलाय.

आज ही लोकं हल्लाबोल यात्रा काढताय. पण जर 15 वर्षं डल्ला मारला नसता तर आज हल्लाबोल यात्रा काढायची गरज भासली नसती. जर हल्लाबोल केला तर यांचा इतका माल मसाला आमच्याकडे आहे तो आम्ही उघडा करू,  त्यामुळे यांचा हल्ला यांच्यावरच परतवून लावल्याशिवाय राहणार नाही असा इशाराच मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीला दिलाय.

तसंच शेतकऱ्यांची आज झालेली अवस्था ही आघाडी सरकारमुळेच झाली आहे असा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 1, 2017 11:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close