S M L

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर रास्तारोको मागे, धनाजी जाधवांवर होणार अंत्यसंस्कार

मुख्यमंत्र्यांनी फोनवरुन केल धनाजी जाधव यांच्या भावाचं सांत्वन, तर आत्महत्याग्रस्थ शेतकऱ्यांच्या मुलांचं मुख्यमंत्री घेणार पालकतत्व

Samruddha Bhambure | Updated On: Jun 8, 2017 02:37 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर रास्तारोको मागे, धनाजी जाधवांवर होणार अंत्यसंस्कार

08 जून : शेतकरी संपामुळे राज्यातील वातावरण तापले असतानाच सोलापुरात कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. धनाजी जाधव असं त्यांचं नाव आहे. आत्महत्येपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत त्यांनी मुख्यमंत्री आल्याशिवाय माझं प्रेत जाळू नका, असं म्हटलं आहे. कर्जमाफीच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन पेटलं असताना करमाळ्यात धनाजी जाधव यांच्या आत्महत्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

आत्महत्येमुळे करमाळ्यात तणाव निर्माण झाला. ग्रामस्थांनी संतप्त होऊन रास्तारोको केला. घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पालकमंत्री विजय देशमुख घटनास्थळी दाखल झाले.  तसंच मुंख्यमंत्र्यांनी फोनवरुन जावध यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं आहे. त्यामुळे थोड्याच वेळात धनाजी जाधव यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

आत्महत्या केलेले शेतकरी धनाजी जाधव यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन भाऊ, दोन मुलं असा परिवार आहे. एक मुलगा बारावी आणि दुसरा दहावीला आहे.

मुख्यमंत्र्यांनी फोनवरून धनाजी जाधव यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं तसच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदतीचेही आश्वासन दिले. त्यासोबतच, इतर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या पालकत्वाची जबाबदारीही मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 8, 2017 02:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close