S M L

मुख्यमंत्र्यांनी रद्द केले राज्यातले दौरे

काल नाशिकमध्ये सुकाणू समितीने मंत्र्यांना गावबंदीचा इशारा दिला आणि मुख्यमंत्र्यांचे हे दोन्ही नियोजित दौरे रद्द करण्यात आलेत.

Sonali Deshpande | Updated On: Jun 9, 2017 02:12 PM IST

मुख्यमंत्र्यांनी रद्द केले राज्यातले दौरे

09 जून : मुख्यमंत्र्यांनी अहमदनगरपाठोपाठ जळगावचाही नियोजित दौरा रद्द केलाय.  खरं तर या दोन्ही दौऱ्यांसाठी प्रशासनाकडून भूरपूर तयारी देखील करण्यात आली होती. काल रात्रीपर्यंत जळगाव दौऱ्याची तयारी सुरू होती. पण काल नाशिकमध्ये सुकाणू समितीने मंत्र्यांना गावबंदीचा इशारा दिला आणि मुख्यमंत्र्यांचे हे दोन्ही नियोजित दौरे रद्द करण्यात आलेत.

मध्यंतरी अमरावतीतही काँग्रेस कार्यकर्त्यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांची गाडी अडवली होती. त्यांच्यावर कांदे फेकले होते.  थोडक्यात सरकारने शेतकरी संपवाल्यांचा चांगलाच धसका घेतल्याचं दिसून येतंय.

अर्थात, दौरे रद्द झाले, तरीही आज  मुख्यमंत्री कृषी विभागाच्या बैठका घेतायत. पण एकूणच या शेतकरी संपामुळे राज्यातलं वातावरण चिघळल्याचं दिसतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 9, 2017 02:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close