S M L

तळीरामांचं हार घालून स्वागत, महिलांची अशीही गांधीगिरी

Sachin Salve | Updated On: May 23, 2017 11:20 PM IST

तळीरामांचं हार घालून स्वागत, महिलांची अशीही गांधीगिरी

23 मे : दारूची दुकानं बंद होत नाही म्हणून महिलांनी गांधीगिरी आंदोलन करत चक्क दारूड्यांना हार घालून स्वागत केलंय. बुलडाणा जिल्ह्यातील धाड गावात ही घटना घडली.

गेल्या दोन महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार मुख्य मार्गापासून ५०० मीटर अंतरावील दोन देशी दारूचे दुकान बंद झाली. मात्र, गावातील एक दुकान मात्र सुरू आहे. परिणामी या ठिकाणी दारू पिणाऱ्यांची संख्या वाढल्याने इथं प्रमाणाबाहेर गर्दी होत आहे. याचा सर्वाधिक त्रास गावातील महिलांना, वृद्ध  नागरिकांना व मुलांना होत आहे. यासंदर्भात गावातील ३०० पेक्षा जास्त महिलांनी १ मे रोजी ग्रामसभेत आग्रही मागणी करत दारूचे दुकान हे गावाबाहेर हटवण्याचा ग्रामसभेचा ठराव घेतला. तसंच

जिल्हाधिकारी बुलडाणा यांना निवेदन देवून १५ दिवसाची मुदत दिली. मात्र, आजपर्यंत यावर कुठलीच कारवाई न झाल्याने अखेर धाड येथील महिलांनी देशी दारूच्या दुकानासमोर जमून दारू पिण्यास येणाऱ्या तळीरामांचा पुष्पहार घालून गांधीगिरी करत स्वागत केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 23, 2017 11:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close