S M L

भाजपचे जयकुमार रावल नारायण राणेंची भेट!, चर्चांना उधाण

राज्याचे पर्यटनमंत्री आणि भाजपचे नेते जयकुमार रावल यांनी आज (रविवारी) काँग्रेस नेते नारायण राणेंची भेट घेतली. मात्र या भेटीनंतर राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा रंगू लागल्या आहेत.

Samruddha Bhambure | Updated On: Apr 2, 2017 03:47 PM IST

भाजपचे जयकुमार रावल नारायण राणेंची भेट!, चर्चांना उधाण

02 एप्रिल :  राज्याचे पर्यटनमंत्री आणि भाजपचे नेते जयकुमार रावल यांनी आज (रविवारी) काँग्रेस नेते नारायण राणेंची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये राणेंच्या कणकवलीच्या बंगल्यावर जवळपास अर्धा तास चर्चा झाली. मात्र त्यांच्यात काय चर्चा झाली हे काही कळू शकलेलं नाही.

राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल सध्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. त्यांनी नारायण राणेंच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. रावल यांनी सिंधुदुर्गमधील पर्यटन विकासाच्या मुद्द्यावर चर्चा केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मात्र या भेटीनंतर राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा रंगू लागल्या आहेत. कारण गेल्या अनेक दिवसांपसून राणे भाजपमध्ये जाणार का?, याबाबतच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर माध्यमांसमोर बोलताना काँग्रेसचे नेतेच अशाप्रकारच्या अफवा पसरवत असल्याचा आरोप राणेंनी केला होता. तसंच पक्षबदलाच्या शक्यतांनाही पूर्णविराम दिला होता.

राणे पिता-पुत्रांनी तर काँग्रेसला अल्टिमेटमही दिलं होतं, पण त्याचं पुढे काहीच झालं नाही.  त्यानंतर राणेंच्या पक्षांतराच्या बातम्या थंडावल्या. पण आज राणे आणि रावल यांच्यात भेट झाल्याने या चर्चांना पुन्हा हवा मिळाली आहे. त्यामुळे राणे आणि भाजपमध्ये नेमकं काय शिजतंय, याबाबत सस्पेन्स कायम आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 2, 2017 03:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close