S M L

प्रल्हाद केशव अत्रे: दहा हजार वर्षात असा माणूस होणे नाही

मराठीतील नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, संपादक, पत्रकार, हिंदी आणि मराठी सिनेमांचं निर्माते, राजकारणी आणि फर्डे वक्ते असे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू होते.

Chittatosh Khandekar | Updated On: Aug 13, 2017 01:25 PM IST

प्रल्हाद केशव अत्रे: दहा हजार वर्षात असा माणूस होणे नाही

13 ऑगस्ट: महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेल्या प्रल्हाद केशव अत्र्यांचा आज जन्मदिवस. त्यांचा जन्म पुण्याजवळील सासवड येथे झाला होता.

मराठीतील नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, संपादक, पत्रकार, हिंदी आणि मराठी सिनेमांचं निर्माते, राजकारणी आणि फर्डे वक्ते असे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू होते. संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी पुकारण्यात लढ्यातले ते अग्रणी नेते होते. अत्र्यांच्या घणाघाती भाषणांच्या जोरावरच संयुक्त महाराष्ट्र मिळवणं शक्य झालं. 'नवयुग' या साप्ताहिकाचं आणि 'मराठा' या दैनिकाचं त्यांनी संपादन केलं. सुवर्णकमळ मिळवणारा पहिला मराठी सिनेमा ठरलेल्या 'श्यामची आई' या सिनेमाची निर्मितीही अत्र्यांचीच होती.

दहा हजार वर्षात असा माणूस होणे नाही आणि होणारही नाही अशी अत्र्यांची शाब्दीक कोटी विषेश प्रसिद्ध होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 13, 2017 11:25 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close