S M L

यापुढे जातीय दंगली घडवल्या जातील,भीमा कोरेगाव सुरुवात-राज ठाकरे

कोकण दौऱ्यावर असलेले राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन भीमा कोरेगाव प्रकरणावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली

Sachin Salve | Updated On: Jan 12, 2018 07:57 PM IST

यापुढे जातीय दंगली घडवल्या जातील,भीमा कोरेगाव सुरुवात-राज ठाकरे

12 जानेवारी : देशात यापुढे धार्मिक आणि जातीय दंगली घडवल्या जातील आणि भिमा कोरेगाव ही त्याची सुरुवात आहे अशी भीती मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली. तसंच आज सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी घेतलेली पत्रकार परिषदही देश अराजकतेकडे जाण्यास सुरुवात आहे असंही राज ठाकरे म्हणाले.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे कोकणाच्या दौऱ्यावर आहे. यावेळी पत्रकार परिषद घेऊन भीमा कोरेगाव प्रकरणावर राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. देशात यापुढे धार्मिक आणि जातीय दंगली घडवल्या जातील आणि भिमा कोरेगाव ही त्याची सुरुवात आहे असं राज ठाकरे म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशानाच जर त्यांच्यावर झालेला अन्याय पत्रकारांसमोर आणावासा वाटत असेल तर सामान्य जनतेला न्याय मिळेल असे आता वाटत नाही आणि देश अराजकतेकडे जायची सुरुवात झालेली आहे असं  राज ठाकरे म्हणाले.

तसंच या देशात लोकशाही नांदत नाही हे वारंवार सिद्ध होतंय. भाजपाला विजय हा एव्हीएम मधल्या फेरफारानेच मिळतोय. निवडणूक आयोगही सत्तेला बांधील झालाय असा आरोप राज ठाकरेंनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 12, 2018 07:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close