S M L

अंगणवाडी सेविकांचा आज राज्यभर महामोर्चा

या मोर्चात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे सहभागी होणार आहेत. ते आझाद मैदानात भाषणही करणार आहेत. अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाला शिवसेनेनं आधीच पाठिंबा जाहीर केलाय.

Chittatosh Khandekar | Updated On: Sep 27, 2017 02:25 PM IST

अंगणवाडी सेविकांचा आज राज्यभर महामोर्चा

 27 सप्टेंबर: महाराष्ट्रातील दोन लाखाहून अधिक अंगणवाडी सेविकांच्या आज विविध मागण्यांसाठी राज्यभर महामोर्चा निघणार आहे. अंगणवाडी सेविकांचा प्रमुख मोर्चा मुंबईतल्या आझाद मैदानात होणार आहे.

गेले अनेक दिवस आपल्या मागण्या राज्य सराकरसमोर अंगणवाडी सेविका मांडत आहे. पण त्यांच्या मागण्यांकडे सरकार लक्ष देत नाही असा आरोप राज्य सरकारवर होतो आहे. या मोर्चात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे सहभागी होणार आहेत. ते आझाद मैदानात भाषणही करणार आहेत. अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाला शिवसेनेनं आधीच पाठिंबा जाहीर केलाय. त्यामुळे शिवसेनेचीही ताकद अंगणवाडी सेविकांच्या मोर्चाला मिळणार आहे. गेले पंधरा दिवस राज्यातील अंगणवाडी सेविकांचा संप सुरू आहे

या संपामुळे राज्यातील ७३ लाख मुलं पोषण आहारापासून वंचित आहेत. त्यामुळे अंगणवाडी सेविकांचा प्रश्नं, तात्काळ सुटावा अशी मागणी केली जाते आहे. आता यावर सरकार काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

काय आहेत अंगणवाडी सेविकांच्या मागण्या?

राज्यात 2 लाख 7 हजार अंगणवाडी सेविका

अंगणवाडी सेविकांचा पगार फक्त 5 हजार रुपये

किमान 8 हजार पगार करण्याची मुख्य मागणी

सेवा ज्येष्ठतेनुसार मानधनात वाढ मिळावी

राज्य सरकारकडून पगारवाढ फक्त 1500 रुपये

इतर राज्यात अंगणवाडी सेविकांना 10 हजार वेतन

इतर राज्यांप्रमाणे मासिक वेतन मिळण्याची मागणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 27, 2017 09:32 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close