S M L

अमरावतीच्या पंजाबराव रुग्णालयात चार नवजात अर्भकांचा मृत्यू, मृत्यूचं कारण अस्पष्ट

डाॅक्टराने या बालकांना औषधींचा ओव्हर डोज दिल्यानेच मृत्यू झाला असा आरोप मृत बालकांच्या नातेवाईकांनी केला असून डाॅक्टरावर कारवाईची मागणी केलीये

Sachin Salve | Updated On: May 29, 2017 08:11 PM IST

अमरावतीच्या पंजाबराव रुग्णालयात चार नवजात अर्भकांचा मृत्यू, मृत्यूचं कारण अस्पष्ट

29 मे : अमरावतीच्या पंजाबराव देशमुख रुग्णालयात 4 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडलीये. रविवारी रात्री ही घटना घडलीय.

शिवाजी शिक्षण संस्थेच्या डाॅ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात रविवारी रात्री 4 नवजात बालकांचा मृत्यू झाला.  डाॅक्टराने या बालकांना औषधींचा ओव्हर डोज दिल्यानेच मृत्यू झाला असा आरोप मृत बालकांच्या नातेवाईकांनी केला असून डाॅक्टरावर कारवाईची मागणी केलीये. यामुळे बराच वेळ रुग्णालयात चांगलाच तणाव निर्माण झाला होता.

या रुग्णालयात अपुऱ्या सोई सुविधा असल्याचे अनेकदा इंडियन मेडिकल कौन्सिलने दंड केलाय. यापूर्वी वर्षभरापूर्वी देखील याच महाविद्यालयात एमबीबीएसला शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यांचा रात्रीच्या वेळी उशिरा उपचार केल्याने मृत्यू झाला होता. आजच्या या घटनेने या रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयाकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण कोणतेही योग्य असे उत्तर मिळत नाही. तसंच रुग्णालयाचे डीन डॉ दिनेश जाणे यांच्याशी सुद्धा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तरीही अद्याप उत्तर मिळू शकलं नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 29, 2017 08:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close