S M L

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी मेजर रमेश उपाध्याय यांना जामीन

मुंबई हायकोर्टानं त्याला 1 लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केलाय. मालेगाव बॉम्बस्फोटातल्या सहभागाच्या आरोपावरुन त्याला अटक करण्यात आली होती.

Chittatosh Khandekar | Updated On: Sep 27, 2017 12:12 PM IST

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी मेजर रमेश उपाध्याय यांना जामीन

मुंबई, 27सप्टेंबर: 2008च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातला आरोपी मेजर रमेश उपाध्यायला जामीन मिळाला आहे. मुंबई हायकोर्टानं त्याला 1 लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केलाय. मालेगाव बॉम्बस्फोटातल्या सहभागाच्या आरोपावरुन त्याला अटक करण्यात आली होती.

तब्बल ९ वर्षांनी उपाध्याय आता जेलमधून बाहेर पडेल. १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर उपाध्याय यांची तुरुंगातून मुक्तता होईल. पण जामीन मंजूर करतानाच उपाध्यायला देशाबाहेर जाण्यास कोर्टाने मनाई केली आहे. उपाध्याय हा कर्नल प्रसाद पुरोहितसोबत मालेगाव बॉम्बस्फोट कटात सहभागी होता असा आरोप त्याच्यावर आहे. बॉम्बस्फोटाच्या कटासंदर्भात भोपाळ, फरिदाबाद यांसह अनेक ठिकाणी झालेल्या बैठकांमध्ये सहभागी असल्याचा आरोप उपाध्यायवर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 27, 2017 12:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close