S M L

अशी जपा आपल्या प्रेमाची नाती

या धावत्या आयुष्यात महत्वाची असणारी नाती हरवत चालली आहे.त्याच नात्यांना जपण्यासाठी काही खास टिप्स...

Chittatosh Khandekar | Updated On: Nov 7, 2017 12:35 PM IST

अशी जपा आपल्या प्रेमाची नाती

07 नोव्हेंबर:  सध्याच्या जगात आपण स्वतःचा खूप विचार करतो पण आपल्या नात्यांचं फारस महत्व देत नाही. या धावत्या आयुष्यात महत्वाची असणारी नाती हरवत चालली आहे.त्याच नात्यांना जपण्यासाठी काही खास टिप्स...

1) नातं म्हणजे एक प्रकारची गुंतवकणूक असते. आपल्या प्रेमाची, विश्वासाची, एकमेकांना अवघड काळात मदत करण्यासाठी, आनंदात सहभागी होण्यासाठी ही मोलाची नाती खूप महत्वाची आहे.

2) नात्यांमध्ये जितकं द्याल तितकंच तुम्हाला परत मिळेल. तुम्ही जितकं प्रेम कराल, विश्वास दाखवाल तितकांच तो तुम्हालाही मिळेल. त्यामुळे एकमेकांना समजून घेणं हेच महत्वाचं आहे.

3) मतभेद प्रत्येक नात्यामध्ये असतात म्हणून वाद घालत बसणं काहीच फायद्याचं नाही. त्यामुळे जर समोरचा बदलणार नसेल तर त्याच्याकडून अपेक्षा करण्यापेक्षा स्वतःला बदला. एखाद्याकडून अपेक्षा करणं कमी करा.

4) आताची नाती पैशावर चालतात आणि त्यामुळे आपण आपल्या प्रिय व्यक्तीला गमावून बसतो. म्हणून नात्यांमध्ये कधीही पैश्याचं मोजमाप नको.

5) नातं म्हणजे फक्त रक्ताचं नात नाही, तर नात म्हणजे जे मनातून जूळतं, एक रेशीम धागा जो अती ताणला तर तुटून जातो. म्हणून नात्याला खूप हळूवार आणि प्रेमाने जपा.

6) कोणी येईल आणि मला खुश ठेवेल या विचारात राहू नका आणि मी खुश नाही याचं खापर नात्यावरही फोडू नका.

7) नात्यांमध्ये विश्वासाच्या जोरावर आपलं महत्व सिद्ध करा. त्याने समोरच्याच्या मनात तुमच्याबद्दल फक्त प्रेमचं नाही तर अभिमानही असेल.

8) एखाद्याची गोष्ट जर आपल्याला पटत नसेल तर जरा विचार करा, असं नको व्हायला की कळतं नकळंत तुम्हीही तसचं वागता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 7, 2017 12:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close