S M L

व्हिटॅमिन एच्या कमतरतेमुळे क्षयरोग होण्याची शक्यता

नुकत्याच हार्वड युनिवर्सिटीनं केलेल्या एका रिसर्चनुसार व्हिटॅमिन एची कमतरता असेल तर टीबी होण्याची शक्यता दहापट वाढते.

Sonali Deshpande | Updated On: Jun 20, 2017 01:06 PM IST

व्हिटॅमिन एच्या कमतरतेमुळे क्षयरोग होण्याची शक्यता

20 जून : तुमच्या आहारात व्हिटॅमिन एची  कमतरता आहे का ? तुम्ही गाजर टोमॅटो, पालेभाज्या कमी खाता का ? असं असेल तर हे तुमच्यासाठी धोकादायक असू शकतं. नुकत्याच हार्वड युनिवर्सिटीनं केलेल्या एका रिसर्चनुसार व्हिटॅमिन एची  कमतरता असेल तर टीबी होण्याची शक्यता दहापट वाढते.

व्हिटॅमिन ए तुमची प्रतिकारक शक्ती वाढवतं. आता हेच रिसर्चर्स  विटॅमिन ए हा क्षयावर औषध होऊ शकतं का, याचा अभ्यास करत आहेत .

हे संशोधन हावर्डच्या प्राध्यापक मॅग्नम मुरे यांच्या टीमनं केलाय. या रिसर्चसाठी तब्बल 6,000 लोकंच्या रक्ताची चाचणी केली गेली .हे सगळे लोक क्षय असलेल्या लोकांच्या संपर्कात होते .यातील 250 लोकांना क्षयाची आधीच लागण झाल्याचं कळलं .तर अनेकांना नंतर लागण झाली. या सगळ्या लोकांवर एक वर्षभर लक्ष ठेवण्यात आलंय.

यातील ज्या लोकांच्या आहारामध्ये व्हिटॅमिन एची कमी होती त्यांना टीबीची लागण लवकर  झाल्याचं दिसून आलं. त्यातही 18-19 वयोगटातल्या तरूणांमध्ये जर ही कमतरता असेल तर टीबी होण्याची शक्यता वीसपट वाढते हे लक्षात आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 20, 2017 01:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close