S M L

दातांच्या दुखण्यावर रामबाण घरगुती उपाय

जसे कुठल्याही प्रकारच्या संसर्गामुळे, मधुमेहामुळे किंवा दातांची योग्य काळजी न घेतल्याने दातांच्या समस्या येऊ शकतात. जर तुम्हीही दातांच्या दुखण्यामुळे हैराण झाले असाल तर त्यावर काही घरगुती उपाय

Chittatosh Khandekar | Updated On: Oct 26, 2017 12:57 PM IST

दातांच्या दुखण्यावर रामबाण घरगुती उपाय

26 ऑक्टोबर: दातांच्या दु:खण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत ठरतात. जसे कुठल्याही प्रकारच्या संसर्गामुळे, मधुमेहामुळे किंवा दातांची योग्य काळजी न घेतल्याने दातांच्या समस्या येऊ शकतात. जर तुम्हीही दातांच्या दुखण्यामुळे हैराण झाले असाल तर त्यावर काही घरगुती उपाय

हिंग

दाताच्या दु:खण्यावर रामबाण घरगुती उपाय म्हणजे हिंग. हिंग साधारणत: सगळ्यांच्याच घरी उपलब्ध असतं.

उपचारासाठी चिमुटभर हिंग घ्या. त्याला मोसंबीच्या रसात मिसळा. या मिश्रणात कापूस भिजवा आणि भिजलेला कापूस दुखणाऱ्या दाताजवळ पकडा. याने आपल्या दातांचं दुखणे कमी होईल. हा घरगुती उपाय खूप सोपा आणि प्रभावी आहे.

लवंग

लवंगामध्ये औषधी गुण असतात. ज्यामुळे जंतू आणि इतर जीवाणू नष्ट होतात. लवंग दुखणाऱ्या दाताजवळ पकडा. त्यामुळे दाताचे दुखणे कमी होते. परंतु दुखण कमी होण्यासाठी वेळ लागतो.

कांदा

जे लोक रोजच्या रोज कच्चा कांदा खातात ते दाताच्या दुखण्यापासून दूर राहतात. जर तुम्हाला दातांचे दुखणे असेल तर कांद्याचे तुकडे दाताजवळ धरा किंवा कांदा चावून खा. असं केल्याने काही वेळातच तुम्हाला आराम मिळेल.

लसूण

लसूणही दाताच्या दुखण्यासाठी आरामदायी आहे. कच्च्या लसणाच्या दोन-तीन पाकळ्या दाताने चावा. लसूण कापूनही दाताजवळ पकडू शकता. लसणामध्ये एलिसीन असतं जे आपल्या दातातील जंतू नष्ट करतात आणि दाताला आराम मिळतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 26, 2017 12:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close