S M L

विनोद खन्ना हाॅस्पिटलमध्ये,प्रकृतीत सुधारणा

अभिनेते विनोद खन्ना यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाल्यामुळे त्यांना मुंबईतल्या हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

Sonali Deshpande | Updated On: Apr 6, 2017 01:26 PM IST

विनोद खन्ना हाॅस्पिटलमध्ये,प्रकृतीत सुधारणा

06 एप्रिल : अभिनेते विनोद खन्ना यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाल्यामुळे त्यांना मुंबईतल्या हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांना डिहाइड्रेशनचा त्रास झालाय. मात्र आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिलीय.

बऱ्याच दिवसांपासून विनोद खन्ना यांना डिहाइड्रेशनचा त्रास होत होता. घरी उपचार चालू असताना प्रकृतीत सुधारणा न झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. गेले काही दिवस ते कॅन्सरवरही उपचार घेतायत.

विनोद खन्ना यांनी शाहरुखच्या 'दिलवाले' सिनेमात काम केलं होतं. आता ते हेमा मालिनी यांच्या 'एक थी रानी ऐसी भी' या मालिकेत काम करतायत. ही मालिका राजमाता विजयराजे सिंधिया यांच्या जीवनावर आधारित आहे. ते ग्वालियर महाराजांची भूमिका साकारतायत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 6, 2017 11:00 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close