S M L

संसदेत पहिल्यांदाच 'या' चित्रपटाचा ट्रेलर होणार रिलीज

भारताच्या इतिहासात पहिल्यांदा कुठल्यातरी चित्रपटाचा ट्रेलर संसदेत रिलीज होणार आहे.स्वातंत्र्य संग्रामातल्या वीरांचा सन्मान करण्यासाठी असं केलं जाणार आहे

Sonali Deshpande | Updated On: Jun 23, 2017 06:05 PM IST

संसदेत पहिल्यांदाच 'या' चित्रपटाचा ट्रेलर होणार रिलीज

23 जून : तिग्मांशू धुलियांचा नवा चित्रपट 'राग देश'चा ट्रेलर संसदेत रिलीज होणार आहे. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच कुठल्यातरी चित्रपटाचा ट्रेलर संसदेत रिलीज होणार आहे.स्वातंत्र्य संग्रामातल्या वीरांचा सन्मान करण्यासाठी असं केलं जाणार आहे .याआधी कुठल्याही सिनेमाला अशी परवानगी मिळाली नव्हती.

हा चित्रपट स्वातंत्र्यपूर्व काळातल्या 'लाल किला' केस वर आधारित आहे .या केसनं भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामाची दशा आणि दिशाच बदलली.हा खटला आझाद हिंद सेनेच्या तिघांवर चालवला गेला होता.

या सिनेमात कुणाल कपुर ,अमित साध,आणि मोहीत मारवाह प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.या सिनेमाबद्दल बोलताना तिग्मांशू धुलिया असंही म्हणाले की या चित्रपटातल्या काही गोष्टी वादग्रस्तही ठरू शकतात. जसं की जवाहरलाल नेहरूंच सिग्रेट पिणं.हा सिनेमा 28 जुलैला रिलीज होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 23, 2017 04:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close