S M L

'बाहुबली'नंतर आता बजरंगबली, 500 कोटींचं बनतंय 3डी रामायण

हा सिनेमा तेलगू, तामिळ आणि हिंदीमध्ये तयार होईल. 3डीमध्ये शूट केला जाईल.

Sonali Deshpande | Updated On: May 11, 2017 04:04 PM IST

'बाहुबली'नंतर आता बजरंगबली, 500 कोटींचं बनतंय 3डी रामायण

11 मे : बाहुबलीच्या सुपरडुपर  यशानंतर पौराणिक विषयांचे सिनेमे बनवण्याकडे निर्मात्यांचा कल आहे.  महाभारतावर सिनेमा करण्याची चर्चा आहेच. पण बातमी अशी आहे की महाकाव्य रामायणावर सिनेमा बनणार आहे आणि तोही 3 डी.

500 कोटींच्या या सिनेमासाठी तीन निर्माते एकत्र आलेत. अलू अरविंद, नमित मल्होत्रा, मधू मंतेना हे तिघं मिळून या सिनेमाची निर्मिती करणार आहेत. हा सिनेमा तेलगू, तामिळ आणि हिंदीमध्ये तयार होईल. 3डीमध्ये शूट केला जाईल. तीन भागांमध्ये तो रिलीज केला जाईल.

अलू अरविंद म्हणतात, ' ही एक मोठी जबाबदारी आहे. रामायण मोठ्या पडद्यावर पाहणं हा मोठा अनुभव असेल. '

तीन निर्माते वर्षभरापेक्षा जास्त वेळ स्क्रीप्टवर काम करतायत. 1987 -88मध्ये रामानंद सागर यांचं रामायण प्रचंड लोकप्रिय झालं. 2008मध्ये सागर आर्ट्सनं पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर रामायण आणलं होतं.

निर्माते नमित म्हणातात, ' माझ्या तीन पिढ्या सिनेमात आहेत. भारतातल्या रामायण या महाकाव्याला मोठ्या पडद्यावर पाहणं ही एक अनुभूती ठरेल. प्रत्येकाला त्याचा अभिमान वाटेल. '

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 11, 2017 04:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

News18 Lokmat
close